विद्यार्थी
लेखन संग्रह
माझ्या शाळेचा अनुभव माझ्या शब्दात
* कु.-
उज्वला शाम खैरनार. *
इयत्ता ७ वी.
मी पाच
वर्षाची असतांना मला माझ्या आई-वडिलांनी बालविद्या निकेतन प्राथमिक शाळा, या शाळेत
टाकले. त्यावेळी माझा प्रवेश इयत्ता १ ली ला केला गेला. तेव्हा मला मेधने (देवरे)
टीचर होते. त्यांनी मला अ,आ,इ,ई......... A, B, C, D........ हे अक्षरे मला
नवीन होते. त्यावेळी माझ्या टीचरांनी या सर्व अक्षरांची ओळख करून दिली. हातात
पेन्सिल कशी धरावी. वाचन-लेखन कसे करावे ते खूप छान शिकवले त्यामुळे सर्व अक्षरे
कायम लक्षात राहिले. देवरे टीचर सर्वांचे वाचन-लेखन घायचे आणि पाठांतर करायला
सांगायचे. त्यावेळी आम्हांला खूप मजा येत. मग तेव्हा कुठे मला आणि माझ्या वर्गातील
मुला-मुलींना वाचन लेखन यायला लागले. असेच दिवस आनंदाने जात होते कि माझ्यावर खूप
मोठे दु:ख आले. ते असे कि आमच्या घरची आर्थिक परिस्थिती इतकी हलाकीची झाली कि मला
माझ्या वडिलांनी मला व माझ्या भावाला आश्रम शाळेत टाकले. माझ्यावर इतके मोठे दु:ख
कोसळले कि शाळेच्या आठवणीत नेहमी रडत असे. मग खूप दिवसांनी मला माझ्या आईने परत
माझ्या आवडत्या शाळेत म्हणजे बालविद्या निकेतन प्राथमिक शाळेत नेले आणि माझ्या
आनंदाला एक नवीन उफान आले. मला माझे मैत्रिणी परत मिळाल्या. त्यानंतर मी आता
इयत्ता ७ वीला आहे, आता मी सर्व स्पर्धा परीक्षा, जयंती-पुण्यतिथी, कोणतेही
कार्यक्रम असो मी आनंदाने सहभाग घेते.
आम्हांला एक नवीन सूचना
मिळाली कि आमच्या शाळेची शैक्षणिक सहल घृष्णेश्वर-दौलताबाद-भद्रमारुती-वेरूळ इत्यादी
ठिकाणी जाणार आहे. त्यावेळी मला वाटत होते कि मी पण सहलीला जायला हवे आणि सहलीचा
आनंद घ्याला हवे. पण माझ्या घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मी नेहमी माघार घेत असे.
त्यावेळी माझे वर्गशिक्षक आसान सर यांनी मझ्या सहलीचे पैसे भरले आणि मला सांगितले
कि तू पण चल. तेव्हा मला खूप आनंद झाला. म्हणून
माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खूप आवडतात.
असा हा माझा शाळेचा अनुभव! माझ्या शब्दात मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
माझी शाळा, सुंदर शाळा
............
* कु.
मनोज मोहन गवळी. *
इयत्ता ७ वी.
नमस्कार!
माझे नाव मनोज. मी आता तुम्हाला माझ्या शाळेचा अनुभव माझ्या शब्दात सांगतो. मी
लहान होतो त्यावेळी माझी आई मला काका,मामा,पप्पा........ असे कितीतरी शब्द मला
बोलायला शिकवायची. आणि मी ते शब्द बोलायचो. पण एक गोष्ट त्यावेळी कळत नव्हते कि हे
सारे शब्द कसे तयार होतात? आणि त्या प्रश्नाचे उत्तर मला त्यावेळी कळले कि
ज्यावेळी मला माझ्या आईने मला बालविद्या निकेतन प्राथमिक शाळेत माझे प्रवेश केले.
तेव्हा मी इयत्ता १ लीला गेलो आणि तेव्हा आम्हांला मेधने (देवरे) टीचर होत्या, त्या
आम्हाला नेहमी अ,आ,इ,ई....... व इंग्रजी, गणिताचे नवीन शब्द-अंक शिकवायला लागले.
मेधने टीचर
इतेके प्रेमाने शिकवत कि आम्हांला एका क्षणात ते समजून जात आणि जर का आम्हांला
वारंवार सांगूनही समजले नाही कि ते आम्हाला शिक्षा करत आणि काही मुले तर
शिक्षेच्या भितीने मुले समजले असे म्हणत. मग हळू-हळू माझे मित्र जमू लागले. मग
जसा-जसा मी पुढच्या वर्गात जावू लागलो तसे माझे मित्र वाढत गेले. त्यात काही
चांगले तर काही खोडकर मित्र मिळू लागले. आणि मला तेव्हा कळले कि मित्रांशिवाय आपण Enjoy करू शकत नाही.
शाळा म्हटली कि त्यात
सहल, शैक्षणिक कार्यक्रम इत्यादी असतात. त्यामुळे आमच्या शाळेचीही सहल जात होती,
आणि माझीही इच्छा होती म्हणून मी माझे नाव दिले आणि सहलीचे पैसे पण दिले. एक
महत्वाचे म्हणजे मी आज पर्यंत आईशिवाय कुठेही प्रवास केला नव्हता. आणि ते मला आज
सहलीला करायचा होता. मला भितीही वाटत होती पण शिक्षक आणि मित्र असल्यामुळे माझी
भीती थोडीफार कमी झाली. सहलीला खूप मजा आली होती. हा माझा पहिला अनुभव होता आणि
त्यानंतरचा सर्वात महत्वाचा अनुभव म्हणजे ‘शिक्षक’!
५ सप्टेंबर
हा शिक्षक दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. आमच्या शाळेतही शिक्षक दिन
साजरा झाला आणि शिक्षकाची भूमिका घेतली. त्यावेळी मला कळले कि शिक्षक होणे किती
अवघड असते.कारण शिकवणे ही गोष्ट एक वेळ सोपे पण पण विद्यार्थ्याना सांभाळणे आणि
त्यांना योग्य मार्गदर्शन देणे किती कठीण काम असते. असे हे अवघड आणि विद्यार्थी घडवणाऱ्या
सर्व गुरूंना माझा कोटी-कोटी प्रणाम.
* कु.
पूजा गोरख पवार. *
इयत्ता ७ वी.
‘शाळा’
म्हटली की मुले-मुली व शिक्षक येतात.आणि
तद्नंतर शाळेत अनेक कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मला खूप भीत
वाटत असे त्यावेळी मला भाग घेण्यासाठी प्रोस्ताहन देणारे माझे आवडते शिक्षक काळे
(कदम) टीचर व आसान सर यांनी मला कार्यक्रमात सहभाग घेण्याचे महत्व सांगितले आणि
त्या दिवसापासून मी शाळेतील सर्व कार्यक्रमात भाग घेऊ लागले. त्यानंतर
माझ्यापेक्षा मोठ्या मुले-मुली मी त्यांची निरीक्षण करू लागली. त्यांच्या चुका
दुरुस्त करून मी भाषण वगैरे करू लागली. त्यामुळे माझा आत्मविश्वास अधिक वाढू
लागला. असा हा माझा छोटासा अनुभव आहे पण मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा कि
अनुभवामुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळत असते.
मी आजही या
शाळेत इयत्ता ७ वी ला आहे. या शाळेत अनेक अनुभव मला मिळाले. त्यातला आणखी एक अनुभव
असा की माझी जिवलग मैत्रीण वैष्णवी ही घरातल्या काही अडचणीमुळे ती तिच्या आजीकडे
शिकायला ‘देवघट’ या गावी गेली. माला खूप वाईट वाटले कि मी आणि माझी मैत्रीण
आजपर्यंत कधीच वेगळे झालो नव्हतो. आणि ती वेळ आज आली होती. त्यावेळी आसान सरांनी
आम्हा सर्व मुलांना त्यांचा एक अनुभव शेअर केला तो असा कि, त्यांचा एक मित्र आणि
ते खूप जिवलग होते पण तेही शिक्षणामुळे
असेच वेगळे झाले आणि त्यांनी माला सांगितले होते कि प्रत्येकाच्या जीवनात असे
अनुभव येतात आणि मी नेहमी म्हणत होते कि आमच्या
दोघांत असे कधीच होणार नाही! आज मला त्यांनी सांगितलेला एक-एक शब्द आजही आठवतो.
म्हणून मी
वैष्णवीची आजही येण्याची वाट बघत असते. ती नेहमी आली कि मला भेटल्याशिवाय जात
कुठेही जात नाही. आमच्या शाळेतील शिक्षक माला खूप आवडतात. कारण ते नेहमी स्वतःच्या मुलांप्रमाणे त्यांच्या जीवनातील
घटना, प्रसंग, अनुभव सांगत असतात आणि आम्हां मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत असतात.
म्हणून सांगते मित्रांनो अनुभव जीवनात प्रत्येकाने घावे आणि अनुभवला कधीही इग्नोर
करू नये. कारण त्यातच आपल्या जीवनाचा सार असतो.
* कु.विशाखा
दिपक आहिरे. *
इयत्ता ७ वी.
सगळ्यांच्या
जीवनात लहानपणी एक नवीन अनुभव येत असतो ते म्हणजे की नवीन शाळा मी पण एका नवीन
शाळेत बालवाडीत गेले आणि ती म्हणजे बालविद्या निकेतन प्राथमिक शाळा. या शाळेत मी
आता सातवीला आहे. नवीन- नवीन मी शाळेत नेहमी-नेहमी रडत असे त्यावेळी मला शाळेत
जायला आवडत नसे. शिक्षकांनी मला खूप जीव लावला. मला एक प्रसंग आठवतो तो असा की, मी
तिसरीला असतांना मी आणि माझी मैत्रीण मधल्या सुट्टीत दुकानात खाऊ आणण्यासाठी गेलो
होतो. त्यावेळी एका मोटारसायकल वाल्याने मला
धडक दिली. माझ्या पायाला खूप मोठी जखम झाली होती. पायातून रक्त बाहेर येत
होते. ते रक्त बघून मला खूप चक्कर येत होते. मला माझ्या मैत्रींनी कसेतरी शाळेत
नेले आणि आसान सरांना सांगितले. आसान सर खूप दयाळू आहेत. त्यावेळी त्यांच्याकडे
गाडी नव्हती तर त्यांनी शीतल पाटील टीचरांची
गाडी मागितली आणि एका क्षणाचा विलंब न करता मला दवाख्यात घेऊन गेले. तेव्हा
डॉक्टरांनी मला अनेक प्रश्न विचारले आणि माझ्या पायाला बँडेज करून दिले आणि मला इंजेक्शन
पण दिले. मला इंजेक्शनला खूप भीती वाटत होते. आसान सरांनी मला समजावले आणि मी तेव्हा
इंजेक्शन घेतले. मग आम्ही शाळेत आलो आणि सरांनी मला माझ्या घरी सोडले. या वरून मला
असा अनुभव मिळाला कि माझ्या शाळेतील शिक्षक कोणत्याही विद्यार्थ्याला काही दुखापत
झाली तर लगेच त्यावर उपचारकरण्यासाठी दवाखाण्यात घेऊन जातात. असा हा मझा अनुभव
माझ्या शब्दात मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
माझी शाळा, माझे शिक्षक !
* कु. दिपाली रवींद्र आहिरे. *
इयत्ता ५ वी.
शाळा म्हटली कि नव-नवीन
अनुभव येतात. शाळेतच काय पण आपल्या दैनंदिन जीवनातही अनेक अनुभव येत असतात. असाच
मला माझ्या शाळेत आलेला अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. मी तिसरीला होते.
तेव्हा माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले. दिवाळीच्या सुट्टीनंतर मी शाळेत पुन्हा आले.
त्यावेळी माझे वर्गशिक्षक आसान सर होते आणि ते आधीपासून खूप कडक आहेत त्यांनी
मझ्या आईला सांगितले कि ती इतक्या दिवस शाळेत का आली नाही? त्यावेळी माझ्या आईने त्यांना
सांगितले कि तिच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी जालन्याला गेलो होतो. म्हणून ती
सहा महिने शाळेत आली नाही, आणि मग सरांनी समजून घेतले आणि त्यानंतर असेच आनंदाने
माझे शाळेतले दिवस जाऊ लागले. आणि मी ४ थीत गेले. त्यावेळीही आम्हांला आसन सर वर्गशिक्षक होते. पूर्ण
वर्षभर मी शाळेत नियमित अभ्यास करू लागले आणि शाळेत येऊ लागली. वर्षाच्या शेवटच्या
टप्प्यात मला आमच्या शाळेचे संस्थापक पूज्य.पी.ए.पाटील यांची जयंती आली आणि
त्यावेळी शाळेत वर्षभर झालेले कार्यक्रम, स्पर्धा यांचे बक्षिसांचे वाटप होत असते
आणि त्यावेळी अनेक बक्षिस मिळाले. पण त्याच बरोबर मला शाळेचा ‘आदर्श विद्यार्थी
पुरस्कार’ ही मिळाला. आणि त्यावेळी मला आणि माझ्या आई-वडिलांनाही खूप आनंद
झाला. आणि त्यावेळी मला असा अनुभव आला कि आपण नियमित अभ्यास आणि शाळेत जर आलो तर
आपल्याला खूप फायदा होत असतो. आपण हुशारही होत असतो. आता मी पाचवीला आहे. मला ही
शाळा खूप आवडते. मला ह्या शाळेतून दुसऱ्या शाळेत जाऊ वाटत नाही पण आमची शाळा
इयत्ता ७ वी पर्यंत आहे म्हणून मी आता जो पर्यंत ह्या शाळेत राहीन तो पर्यंत मी
खूप आभ्यास आणि मजा करेल. आणि मी सांगायचच विसरले कि या शाळेत माझे आवडते शिक्षक
एकमेव म्हणजे श्री. दिपक आसन सर आहेत. ते खूप हसवतात आणि मारही देतात, त्यांच्या
कडून मलाच काय पण शाळेतल्या सर्व मुलांना नवीन काहीतरी शिकायला मिळत असते.
* कु.
तेजस्वी रमेश जगताप. *
इयत्ता ७ वी.
अभ्यासाचे
महत्व विद्यार्थी जीवनात खूप असते. कारण प्रत्येकाला जीवनात सफल होण्यासाठी शाळा
खूप गरजेची आहे. आणि त्यासोबत अभ्यासही खूप महत्वाचा आहे. असाच माझ्या शालेय
जीवनातला एक लहानसा अनुभव आपल्या समोर मांडत आहे. मी जेव्हा चौथीत शिकत होती
त्यावेळी आमच्या शाळेची शैक्षणिक सहाला जाणार आहे अशी सूचना आमच्या वर्गात आली आणि
त्यावेळी खूप आनंद झाला. मग त्यावली ठरवले कि मी पण सहलीला जाईन, मैत्रिणीसोबत
इंजोयकरेल, पप्पाही सहलीला परवानगी देतील. पण सगळ उलट झाल. मी पप्पांना विचारले तर
त्यांनी सरळ मला नकार दिला. मला त्यावेळी खूप वाईट वाटले. मग असेच दोन-तीन दिवस
गेले आणि सहलीचे पैसे भरण्याची शेवटची मुदत होती तर तेव्हा आमच्या आसान सरांनी
माझ्या पप्पांना कॉल केला आणि पप्पांनी त्यांनाही आधी नकार दिला पण नंतर खूप समजून
सहलीला जाण्याची परवानगी दिली. आणि शाळेत येऊन सहलीचे पैसे भरून दिले. या वरून मला
असा अनुभव आला कि कोणत्याही प्रसंगी खचून न जाता हार माणू नये. हा होता माझा पहिला
अनुभव आणि दुसरा अनुभव असा कि,मी जेव्हा सहावीला होते तेव्हा दुसऱ्या शाळेत निबंध
स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेत मी,विशाखा व पूजा असे अनेक मुलींनी यात भाग
घेतला.आणि त्या निबंधाचा विषय होता. ‘माझे स्वप्न’ आमच्या टीचरांनी सर्वांना तो निबंध कच्चाच
लिहिला लावला. व त्यांनतर टीचरांनी तो चेक
करून आम्हाला नवीन एक फुल स्केप कागद आणण्यास सांगितले. आणि तेव्हा माझी
मैत्रीण विशाखा खूप विसराळू आहे तिने तो फुल स्केप कागद आणला नाही तिला टीचर खूप
रागावले. तेव्हा तिने सांगितले कि मी तो निबंध लिहिला आहे, पण घरच विसरून आली.
तेव्हा आम्ही टीचारांना विचारून विशाखाच्या घरी गेलो तिच्यासोबत मी आणि पूजा आम्ही
तिघेही गेलो आणि तो कागद घेऊन आलो. त्यानंतर आम्ही तो निबंध टीचारांकडे जमा केला
आणि ते निबंध स्पर्धेच्या ठिकाणी पाठवण्यात आले. आणि दुसऱ्या दिवशी निबंध
स्पर्धेचा निकाल आणि मला कळाले कि माझा निबंध स्पर्धेत नंबर आला आहे. मला खूप आनंद
झाला. आणि त्यानंतर मला सर्वांनी अभिनंदन केले आणि तेव्हा मला कळले कि अभ्यास
शिवाय आपण इतर शालेय स्पर्धेतही आपण सहभाग घ्यायाला हवा. असा हा माझा अनुभव मला
नेहमी आठवतो.
* कु.आदित्य साहेबराव बाविस्कर. *
इयत्ता ६ वी.
नमस्कार! मी आदित्य
साहेबराव बाविस्कर. माझा अनुभव सुरु करण्यापूर्वी आपल्याला एक सांगू इच्छितो कि आमच्या
शाळेतील शिक्षक खूप दयाळू आहेत. ते कसे मी या माझ्या अनुभवातून आपल्याला सांगतो. कारण
शिक्षक म्हटला कि आपल्या डोळ्यासमोर एक धिप्पाड व्यक्ती जसे आपण आपल्या घरात
आपल्या वडिलांना घाबरत असतो. तसेच आपण शाळेतील शिक्षकांना घाबरत असतो पण माझ्या
शाळेतील शिक्षकांना बघून तसे काही वाटत नाही कारण माझ्या शाळेतील शिक्षक खूप
प्रेमळ आहेत. यात प्रामुख्याने आमच्या कदम टीचर आणि आमचे आसान सर.
मी आता सहावीला आहे. आणि
यावर्षी आमची शैक्षणिक सहल जात होती. आणि त्या सहलीची फी ४०० रुपये होती. माझी आई
आणि माझे पप्पा मला सहलीला जाऊ देत नव्हते. कारण कि ते म्हणत होते कि आता
आपल्याकडे पैसे नाही आहेत. मग मी शाळेत सरांना सांगितले कि, “मला सहलीला येण्याची
इच्छा आहे पण आई वडील नाही म्हणत आहे.” त्यावेळी आसान सरांनी माझ्या घरी कॉल केला
आणि घरी समजून सांगितले. मझ्या आईने सहलीला जाण्याची परवानगी दिली. माझ्या आईने
सरांना सांगितले कि तुम्ही अर्धी फी भरून द्या मी तुम्हाला थोड्या दिवसांनी देईन.
तेव्हा सर हो म्हटले आणि मला खूप आनंद झाला. असा हा माझा अनुभव छोटासा आहे पण
माझ्यासाठी खूप मोठा असा अनुभव आहे.
* कु.हितेश अरुण खैरनार. *
इयत्ता ७ वी.
माझ्या शाळेचा अनुभव
सुरु करण्याच्या आधी सर्वांना माझा नमस्कार! मी ज्या वेळेला इयत्ता तिसरीला होतो
तेव्हाचा हा अनुभव आहे. आणि त्यावेळी पावसाळ्याचे दिवस होते. मला पावसाळा खूप
आवडतो. तेव्हा आपण घरी असो किंवा कुठेही असो पाऊस पडत असल्यास आपल्याला त्यावेळी
खूप आनंद होत असतो. असेच एकदा मी शाळेत असतांना पाऊस पडत होता आणि आमचे चप्पल- बूट
बाहेर काढलेले होते, आणि ते पावसात भिजून ओट्याच्या खाली वाहून गेले. आम्ही सरांना
न विचारता चप्पल- बूट घेण्यासाठी बाहेर
गेलो आणि पूर्णपणे भिजून आलो. आमच्या शिक्षकांनी आम्हाला खूप रागावले आणि मार
दिला. तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटले. थोड्याच वेळात आमची शाळा सुटली तेव्हा पाऊस
चालू होता. आणि आम्ही घरी जाण्यास निघालो. कारण आम्हाला पावसात भिजायला खूप आवडते.
तेव्हा मी पावसात भिजून घरी गेलो खरे पण त्या पावसात भिजल्यामुळे मी आजारी पडलो. आणि मला तेव्हा आमच्या सरांचा मार आठवला. त्यावेळी
सर आम्हाला नेहमी सांगत होते कि पावसात भिजू नका रे! आजारी पडाल. म्हणून मित्रांनो
आई-वडील, शिक्षक जर आपल्याला रागावत असतील तर त्यावेळी त्यांचा कोणत्याही प्रकारचा
स्वार्थ नसतो तर ते आपली काळजी करत असतात. म्हणून
कधीही त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करू नये. असा हा मझा अनुभव मी आपल्या
समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
* भूमिका किरण पाटील *
इयत्ता ७ वी
माझ्या शाळेचे नाव ‘
बालविद्या निकेतन प्राथमिक शाळा’ असे आहे. आणि या शाळेत मी आता इयत्ता ७ वी ला
आहे. ही शाळा मला खूप आवडते कारण या शळेत मला भरपूर काही नव-नवीन शिकायला मिळाले
आहे. त्याच बरोबर शिक्षकही मला छान लाभले कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी खूप
हुशार झाली आणि त्यामुळे माझ्या आई-वडिलांनाही खूप माझ्यावर अभिमान आहे.
माझ्या शाळेत ३१ डिसेंबर
रोजी इतिहासातील पात्र यांची वेशभूषा करण्यास सांगितले होते.आणि त्यावेळी मला
आमच्या सरांनी वकिलाचा वेश घेण्यास सांगितले पण पण त्याचा ड्रेस मिळत नव्हता
म्हणून मी सरांना कॉल केला आणि विचार्लोये कि वकिलाचा पोशाख मिळत नाही तर मी
म्हाळसा बनून येऊ का? त्यावेळी सरांनी हो सांगितले आणि मला खूप आनद झाला होता.
दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर पूर्ण शाळा अनेक इतिहासातील पत्रांच्या वेशभूषेत
भरून गेली होती. आणि ते दृश्य आजही मला आठवते. आणि प्रर्त्येक जण आप-आपल्या
वेशभूषेचे महत्व आणि ओळख स्टेजवर येऊन सांगत होते. माझ्या वर्गातील सर्व मुले आणि
मुले वेगवेगळा पोशाख परिधान केलेला होता आणि तेही आपआपला परिचय देत होता. आणि मी
ही जो पोशाख परिधान केला होता त्याचा परिचय दिला त्यावेळी मला खूप भीती वाटत होती.
पण सरांनी आम्हाला आधीच सांगितले होते कि आपला आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे.
म्हणून मी पण खूप डेरिंग करून स्टेजवर गेले आणि सर्वांसमोर माझ्या केलेल्या
पोशाखाचा परिचय करून दिला. असा हा माझा अनुभव माझ्या शब्दात.
* कु.सविता संकर
शिंदे. *
इयत्ता ७ वी
माझी शाळा मला खूप
आवडते. कारण माझ्या शाळेतील सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांची खूप काळजी घेत
असतात.व सर्वांकडे त्यांचे लक्ष असते. असेच एकदा मी सहावीला असतांना, आम्हाला
सरांनी मैदानात खेळायला सोडले. त्याव्लेई आम्ही मैत्रिणी पळत-पळत मैदानात जात होतो
तर मला शाळेचा गेट लागला. (पण यावेळ माझीच चूक होती.) तेव्हा माझ्या कपाळाला खूप
मोठी जखम झाली होती. माझ्या मैत्रिणी खूप घाबरल्या होत्या, त्यांनी माझ्या
डोक्याला ओढणी लावली आणि भूमिका म्हणत होती कि, ‘मी आसान सरांना जाऊन सांगते’, पण
मीच तिला थांबवत होते. तेव्हा कुणीतरी आसान सरांना जाऊन सांगितले आणि सर धावत
माझ्याकडे आले. सरांनी माझी जखम बघितली आणि त्यांनी लगेच मला दवाखान्यात घेऊन
गेले. त्यावेळी आमच्या सोबत पवार सर पण होते. मग मला डॉक्टरांनी विचारले कि, “कसे काय लागले तुला?” तेव्हा मी
त्यांना खरे-खरे सांगितले. आणि मग त्यांनी सरांना सांगितले कि हिच्या वडिलांना
बोलून घ्या! मी खूप घाबरलेले होते तेव्हा मी सरांना सांगितले कि प्लीज माझ्या घरी
सांगू नका मला खूप रागवतील. तेव्हा मला सर मला खूप रागावले. आणि माझ्या वडिलांना
कॉल केला. आणि त्यांना दवाखान्यात बोलून घेतले. मग माझे बाबा तिथे आले आणि सरांनी
त्यांना सर्व सांगितले. मला डॉक्टरांनी माझ्या कपाळाला टाके दिले आणि घरी जाण्यास
सांगितले. असा माझा अनुभव मला आजही आठवतं आणि माझ्या अंगाला काटे येत असतात.
* कु.देविका राजेंद्र
शेगर. *
इयत्ता ७ वी.
शिक्षक, गुरु, सर, टीचर
..... असे किती तरी शब्द आपल्या कानावर नेहमी येत असतात. आपल्याला खूप छान वाटते
आणि त्यावेळी आपल्याला ही वाटेते कि आपण यांच्यासारखे ज्ञानदानाचे कार्य करायला
हवे. पण खर सांगते मित्रांनो ‘शिक्षक’ होणे म्हणजे, खडू घेतला हातात आणि लागलो शिकवायला!
असे नव्हे. त्यातही खूप मोठी जबाबदारी असते ती म्हणजे मुलांना सांभाळणे आणि योग्य
मार्गदर्शन करणे व मी याचा परिपूर्ण अनुभव मी माझ्याच शाळेत घेतला आहे. जेव्हा ५
सप्टेंबर होता आणि शाळेत सूचना आली कि, ज्यांना शिक्षक दिनाच्या दिवशी
शिक्षक व्हायचे आहे त्यांनी आसान सरांकडे नावे द्यावी. मी आनंदाने माझे नाव दिले.
माझ्या वर्गातील काही मुले-मुली यांनीही नावे दिली आणि माझ्याकडे इयत्ता ३ रीचा
वर्ग होता. तो वर्ग म्हणजे लहान मुलेच. ते इतकी बडबड कि त्यावेळी मी खूप वैतागले
होते. आणि तेही एका दिवसात. मग मला तेव्हा कळले कि शिक्षक होणे म्हणजे किती कठीण
काम असते. पण मला त्यावेळी खूप आनंद झाला. तो आनंद मी शब्दात ही व्यक्त करू शकत
नाही. असा हा माझा अनुभव मला कधी अनुभवायला मिळाले नसते आणि ते मला मिळाले फक्त
माझ्या शाळेत. त्यामुळे मला माझी शाळा मला खूप आवडते.
* स्नेहा विजय नेरकर. *
इयत्ता ६ वी.
आज आपल्याला कोणतेही
शिक्षण घ्यायचे असल्यास आपल्याला क्लासेस लावावे लागते. मला आत्तापर्यंत जे काही
शिकायला मिळाले ते मी क्लास लावून ही मिळाले नसते. मला माझ्या शाळेत झाडांची काळजी
कशी घेणे, स्वच्छता कशी ठेवणे, आपली वागणूक कशी
असयला हवी...... असे किती तरी मला नवीन या शाळेत शिकायला मिळाले आहे.
त्यामुळे मला या शाळेतून दुसऱ्या शाळेत जावूशी वाटत नाही. पण मला एकच खंत वाटते कि
आमची शाळा फक्त इयत्ता ७ वी पर्यंत आहे. तर चला आता माझ्या अनुभवाकडे. तो असा कि, मी आता
सहावीला आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी शाळेत एक कार्य्कार्म आयोजित केला गेला
की, सर्वांनी काष्टी साड्या नेसून येणे आणि मुलांनी धोतर किंवा पांढरा शर्ट आणि
पायजमा. असा पोशाख सर्वांना करून येण्यास सांगितले. आणि आमच्या शाळेपासून तर
विठ्ठल मंदिरापर्यंत पायीदिंडी काढण्यात आली. त्यावेळी मला खरच आम्ही जणू काही
पंढरपूरला चाललो आहे असा अनुभव मिळाला. आणि ते क्षण मला आज ही आठवतात. मला माझ्या
शिक्षकांना एकच सांगू वाटते कि, लवकरच आठवीचा वर्ग सुरु करा म्हणजे आम्हाला आणखी
काहीतरी नवीन शिकायला मिळेल. धन्यवाद...............
* कु.सत्यम विजय
सानप. *
इयत्ता ६ वी
माझ्या शाळेचे नाव
बालविद्या निकेतन प्राथमिक शाळा असे आहे. मला शाळेत जो अनुभव मिळाला तो शिक्षकांवर
आहे.कारण या शाळेतील शिक्षक खूप चांगले व ज्ञानी आहेत. आणि जे आज मी माझा अनुभव
लिहित आहे त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या शिक्षकांना जाते. मला लेखन कसे करावे ते
शिकायला मिळाले. तर चला सुरुवात करूया माझ्या अनुभवास! मी जेव्हा चौथीत असतांना
मला निबंध कसा लिहावा हे मला आमच्या कदम टीचरांनी शिकवले. आणि कोणताही विषय असो या
शाळेतील शिक्षक नेहमी सर्वांना समजावून सांगतात. असेच भरपूर मला शिकायला मिळाले.
जसे कि लहान मोठ्यांचा आदर करावा, कवायत करणे,लेख लिहिणे, नेहमी अभ्यासात लक्ष
केंद्रित करावे, आई-वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले त्याबद्दल त्यांनी
केलेल्या कार्याचा कधीच विसर पडू देवू नका, गोर गरिबांना नेहमी मदत करावे, मदत
करायला कधीच मागे राहू नये, असे कितीतरी गोष्टी मला या शाळेत शिकायला मिळाले.
आमच्या शाळा लहान आहे. पण आमच्यासाठी ही शाळा खूप मोठी आहे कारण ज्या गोष्टींचे
ज्ञान आई-वडिलांनी द्यायला हवे. ते मला माझ्या या शाळेतील शिक्षकांनी दिले म्हणून मला ही शाळा खुप आवडते.
* कु.भूमिका चैत्राम
निकम. *
इयत्ता ६ वी
माझी शाळा मला खूप
आवडते. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.कोळपकर सर. आहेत. आमच्या शाळेत सर्व
शिक्षक आम्हाला समजून घेतात. त्यामुळे शिकण्यास आनंद होतो.आम्हाला आमच्या शाळेत
नव-नवीन शिकायला मिळते. जसे झाडांना पाणी देणे, वर्गाची व स्वच्छता ठेवणे,
कोणत्याही कार्यक्रमाची तयारी करणे, असे अनेक कामे शिक्षणाव्यतिरिक्त शिकवले जातात. असेच आमच्या शाळेत आता २६
जानेवारीची तयारी चालू होते. त्यावेळी आम्हाला लेझीम,लाठी कवायत, डम्बेल्स व साधी
कवायत असे अनेक प्रकार शिकवले आणि त्याचबरोबर आम्हांला शिकायला मिळाले नसते ते म्हणजे “तीन पावली” हे मालेगावातील फेमस नृत्य आहे. आणि ते आम्हांला
पवार सर आणि आसान सर यांनी आम्हांला शिकवले. आणि याचा सराव जवळपास ३ दिवस चालला. आम्हांला
खूप नवीन वाटत होते पण सरांनी आम्हांला खूप
छान आणि सोप्या पद्धतीने शिकवले. असे अनेक नव-नवीन गोष्टी आम्हांला शिकवले जाते. अशी
माझी शाळा मला खूप आवडते. या शाळेत मला असे अनुभव येत असतात.
* कु. तेजल गौतम पवार. *
इयत्ता ७ वी.
माझ्या शाळेचे नाव
बालविद्या निकेतन प्राथमिक शाळा आहे. माझी शाळा खूप- खूप सुंदर आहे. मी लहान
असतांना त्यावेळी मी कार वर्षाची होती. माझ्या आई-वडिलांनी या शाळेत बालवाडीला
टाकले. मला बालवाडीत जोशी टीचर होत्या. त्यांनी आम्हांला गाणी, गोष्टी, खेळ सांगत
. उजळणी, बाराखडी शिकवली. असेच दोन वर्ष निघून गेले. आणि मी पहिलीला त्याच शाळेत
गेली आणि त्यानंतर आमची खरी शाळा सुरु झाली.तेव्हा आम्हांला देवरे टीचर वर्गशिक्षिका होत्या. त्यांनी आम्हांला
वाचायला, लिहायला, कविता तोंडीपाठ, असे करून घेतले. आमच्या शाळेत नेते, पुढारी,
हुतात्मे, शूरवीर यांच्या जयंती- पुण्यतिथी असे नेक कार्यक्रम घेतले गेले त्यामुळे
त्यांनी केलेले कार्य आम्हांला समजले. आम्हांला भाषण घेण्यास प्रवृत्त केले
जेणेकरून आम्हांला स्टेज डेअरिंग येईल व आमचा आत्मविश्वास बळकट होईल.
शाळेच्या पुढच्या व
मागच्या आवारात विविध झाडे आहेत. त्यांचे संगोपन कसे करावे. त्यांची काळजी कशी
करावी याचेही ज्ञान खास करून आमचे शाळेचे मुख्याध्यापक कोळपकर सर यांनी आम्हला
सांगितले.आणि यात आम्हांलाही भरपूर आनंद येत होता. तसेच शाळेतील रोजचा गृहपाठ,
सुट्यामधील स्वाध्याय असा भरपूर अभ्यास देत असत. त्यामुळे आम्ही खूप हुशार झालो. कालांतराने
आम्हांला इंग्रजी वाचन लेखन जमू लागले. तसेच आम्हांला या शाळेत आसान सरांनी विविध
खेळ शिकवले. जसे लंगडी पळी, आंधळी कोशिंबीर, रिंगोलचे, कब्बडी, खो-खो. कदम
टीचरांनी आम्हला कविता, लेख लिहिणे तसेच गाण्यांना चाल लावणे. असे कितीतरी शिक्षण
आम्हांला या शाळेत मिळाले.
आता मी इयत्ता ७ वीला आहे. आणि
आमचे वर्गशिक्षक आसान सर आहेत. ते खुप कॉमेडी आहेत. पण शिस्तीच्या बाबतीत खूप कडक
आहेत. त्यांना बेशिस्त अजीबात आवडत नाही. आमच्या शाळेतील सर्व मुलांना आसान सर खूप
आवडतात. ते एखाद्या दिवशी कधी रजेवर असले
तर आम्हांला अजिबात करमत नाही. त्यांनी आम्हांला चांगल्या सवयीची शिकवण दिले. शाळेचा
रोजचा युनिफोर्म, मुलींच्या वेण्या, नखे, वर्गातील भांडण, आरडाओरड, असे काहीही
त्यांना चालत नाही. ते आम्हांला
नेहमी म्हणतात, ‘आपले शरिर नेहमी स्वच्छ
आणि सुंदर असायला हवे.आणखी त्यांनी आम्हांला वर्गात नेत्यांची माहिती,
प्रोजेक्ट्स, गाणी, नाटक, नृत्य, ध्वजगीते, पताके असे कितीतरी उपक्रम आमच्याकडून
करून घेतले. अशीही आमची शाळा, आमचे शिक्षक. यांच्याकडून आम्हांला भरपूर काही
अनुभवायला मिळाले. तसे लिहिण्यास भरपूर आहे पण आता मी इथेच थांबते.
धन्यवाद.
* कु. रितेश मोहन
शितोळे. *
इयत्ता ७ वी
नमस्कार! मी रितेश,
आम्ही सातवीला आहोत आणि आम्हांला एक नवीन सूचना मिळाली कि , सर्वांना ‘माझ्या
शाळेचा अनुभव’ लिहायचा आहे. त्यावेळी मला असे वाटत होते कि आता कोणता अनुभव
लिहायचा. मग त्यावेळी मला माझ्या तिसरीचा
प्रसंग आठवला. तो असा........
मी तिसरीला होतो तेव्हा आम्हांला
आसान सर होते. ते शिस्तीच्या बाबतीत खूप कडक आहेत.ते आम्हांला नेहमी खेळ, वर्ग
सजावट करणे, इत्यादी वर्गकामे शिकवायचे आणि आत्ताही शिकवतात. सरांनी आमची तोंडी
परीक्षा घ्यायची ठरवली. त्यावेळी सरांनी आम्हांला एक-एक करून उठवले आणि तोंडी
परिक्ष घेतली. तेव्हा तोंडी परीक्षेत माझा नंबर आला आणि मी खप आनंदीत झालो. तेव्हा
तो आनंद गगनात मावेनासा होता. आणि सरांनी बक्षीस म्हणून मला पाच रुपये दिले.घरी गेल्यानंतर मी माझ्या
वडिलांना सांगितले. माझे वडीलही खुश झाले. आणि मला सांगितले कि आणखी अभ्यास कर. आणि
तेव्हा पासून मला आभ्यास करण्याची आवड खूप झाली. मला एक नवीनच अनुभव मिळाले कि
खेळासोबत अभ्यास किती महत्वाचा आहे.
* कु. हर्षदा रमेश
जगताप. *
इयत्ता ५ वी
आमची शाळा मला खूप
आवडते. का पण कुणास ठाऊक? या शाळेतून घरी सुद्धा जाऊ वाटत नाही.आशी ही आमची शाळा
बालवाडीपासून तर इयत्ता सातवीपर्यंत आहे. लहान शाळा आहे पण या शाळेत खूप मोठे-मोठे
उपक्रम राबविले जात असतात. आमच्या शाळेचे मुख्या. नचिकेत कोळपकर सर आहेत. त्यांनी
आम्हाला खूप नव-नवीन गोष्टी शिकवल्या. आजच्या शिक्षण क्षेत्रात शालेय अभ्यासाव्यतिरिक्त
इतर उपक्रम शिकणे खूप म्हत्वाचे आहे. आणि ते महत्वाचे उपक्रम आमच्या शाळेत राबवले
जात असतात. आता मी ५ वीला आहे. आणि आमचे वर्गशिक्षक कोळपकर सर आहेत ते आम्हाला खूप
छान शिकवतात. त्याचबरोबर आम्हाला इतर विषयांसाठी कदम टीचर, पवार सर, आणि आसान सर
आहेत. मी जेव्हा इयत्ता ३ री पर्यंत शिक्षण घेतले तेव्हा आम्हांला सर्व विषय
वर्गशिक्षक जे असायचे तेच शिकवत. आणि चौथीत गेल्यानंतर आम्हांला विषयानुसार शिक्षक
शिकवण्यास येऊ लागले. आणि तो अनुभव माझ्या जीवनाला नवीन वळण देऊन गेले. कारण एकच शिक्षक सर्व शिकवतो तेव्हा अभ्यासात हवा
तसा रस येत नव्हता. मग त्यावेळी विषयानुसार शिक्षक शिकवतात तेव्हा अभ्यासात एक
वेगळीच गोडी निर्माण झाली. माझ्या ज्ञानात भर पडत गेली. असा हा माझा अनुभव नेहमी
माझ्या लक्षात आहे.
No comments:
Post a Comment