मराठी म्हणी व त्यांचे अर्थ
| अर्थी दान महापुण्य | गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. |
| आईची माया अन् पोर जाईल वाया | फार लाड केले तर मुले बिघडतात |
| आधी पोटोबा मग विठोबा | प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देव – धर्म करणे |
| आपलेच दात आपलेच ओठ | आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. |
| आयत्या बिळावर नागोबा | एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. |
| आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे | अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे |
| आपण हसे लोळायला, शेंबूड आपल्या नाकाला | ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो, तो दोष आपल्या अंगी असणे |
| आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास | मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक, अवस्था निर्माण होणे. |
| आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं | एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. |
| आंधळ्या बहिर्यांची गाठ | एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणार्या दोन माणसांची गाठ पडणे. |
| अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी ? | चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही, उलटी ती दुसऱ्याच्या माथी मारून मारून मोकळे व्हायचे. |
| अडली गाय फटके खाय | एखादा माणूस अडचणीत सापडला, की त्याला हैराण केले जाते. |
| आपला हात जगन्नाथ | आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. |
| असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगा | अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. |
| अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? | कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. |
| अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप | अतिशय उतावळेपणाची कृती. |
| अती खाणे मसणात जाणे | अति खाणे नुकसानकारक असते. |
| अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी | मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. |
| अवचित पडे, नि दंडवत घडे | स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. |
| अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे | एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू. |
| अंथरूण पाहून पाय पसरावे | आपली ऐपत, वकूब पाहून वागावे. |
| अंगापेक्षा बोंगा मोठा | मूळ गोष्टींपेक्षा अनुषांगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे. |
| आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटे | स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे. |
| आपली पाठ आपणास दिसत नाही | स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत. |
| आजा मेला नातू झाला | एखादे नुकसान झाले असता, त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे. |
| आत्याबाईला जर मिशा असत्या तर | नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे. |
| आपल्याच पोळीवर तूप ओढणे | फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. |
| आलिया भोगासी असावे सादर | तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. |
| आवळा देऊन कोहळा काढणे | आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे. |
| आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही | अनुभवाशिवाय शहाणपण नसते. |
| आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन | दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. |
No comments:
Post a Comment