Saturday, 30 November 2019

महात्मा गांधी



मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.

असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. इ.स. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधी आजीवन साम्प्रदायीकातावादाचे (सम्प्रदायांवर राजकारण करणे) विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. इ.स. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. इ.स. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.

गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली त्यांची "अर्धनग्न फकीर" म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू-मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्‍न केले.

Saturday, 29 June 2019




आज आमच्या शाळेत वृक्षदिंडी काढण्यात आली आणि शाळेच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले.

Monday, 17 June 2019



माझ्या youtube चॅनेलला subscribe करा आणि बेलच्या आयकॉनला टच करायला विसरू नका.

Tuesday, 11 June 2019




मराठी सुविचार संग्रह pdf 



Monday, 10 June 2019

आजचा सुविचार

प्रामाणिकपणा हा माणसाचा खरा दागिना आहे.

सिंद्बाद्च्या सात सफरी pdf




Sunday, 9 June 2019

अभ्यासात यश मिळणारच pdf- आचार्य जयप्रकाश बागडे

Wednesday, 5 June 2019

भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ - 2019

!! भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ  - 2019 !! 

♦ !! मंत्री➖खातं !! ♦

▪ नरेंद्र मोदी➖पंतप्रधान
▪ नितीन गडकरी➖रस्ते आणि वाहतूक
▪ अमित शहा➖गृह
▪ पीयूष गोयल➖रेल्वे
▪ राजनाथ सिंह➖संरक्षण
▪ एस. जयशंकर➖परराष्ट्र मंत्री
▪ अरविंद सावंत➖अवजड उद्योग
▪ थावरचंद सिंग गेहलोत➖सामाजिक न्याय
▪ प्रकाश जावडेकर➖माहिती आणि प्रसारण, पर्यावरण
▪ स्मृती इराणी➖महिला आणि बालकल्याण
▪ डॉ. हर्षवर्धन➖आरोग्य
▪ निर्मला सीतारामन➖अर्थ
▪ सदानंद गौडा➖रसायन आणि खते
▪ नरेंद्रसिंग तोमर➖कृषी आणि ग्रामविकास
▪ रमेश पोखरियाल निशंक➖मनुष्यबळ विकास
▪ अर्जुन मुंडा➖आदिवासी विकास
▪ धर्मेंद्र प्रधान➖पेट्रोलियम
▪ मुख्तार अब्बास नकवी➖अल्पसंख्याक कल्याण
▪ फग्गनसिंह कुलस्ते➖राज्यमंत्री
▪ महेंद्रनाथ पांडेय➖कौशल्य विकास
▪ गजेंद्र सिंग शेखावत➖जलसंपदा
▪ हरसिमरत कौर बादल➖अन्नप्रक्रिया उद्योग
▪ रविशंकर प्रसाद➖कायदे आणि माहिती तंत्रज्ञान
▪ गिरीराज सिंह➖पशुकल्याण
▪ रामविलास पासवान➖ग्राहक संरक्षण आणि अन्न वितरण

♦ !! स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री !! ♦
▪ राव इंद्रजीत सिंह➖सांख्यिकी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
▪ संतोष गंगवार➖कामगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
▪ श्रीपाद नाईक➖आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
▪ जितेंद्र सिंह➖ईशान्य भारत विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
▪ प्रल्हाद पटेल➖सांस्कृतिक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
▪ अर्जुनराम मेघवाल➖संसदीय कामकाज राज्यमंत्री
▪ जनरल व्ही. के. सिंह➖वाहतूक राज्यमंत्री
▪ कृष्णपाल गुर्जर➖सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री
▪ रावसाहेब दानवे➖सार्वजनिक वितरण राज्यमंत्री
▪ आर. के .सिंह➖उर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
▪ मनसुख मांडविया➖नौकानयन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
▪ जी.कृष्णा रेड्डी➖गृह राज्यमंत्री
▪ पुरुषोत्तम रुपाला➖कृषी राज्यमंत्री
▪ किरन रिजिजू➖युवक आणि क्रीडा कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
▪ हरदीप सिंग पुरी➖गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

♦ !! राज्यमंत्री !! ♦
▪ बाबुल सुप्रियो➖पर्यावरण राज्यमंत्री
▪ संजीव बालियान➖प्राणी आणि पशुकल्याण राज्यमंत्री
▪ संजय धोत्रे➖मनुष्यबळ विकास राज्यमंत्री
▪ अनुराग ठाकूर➖अर्थ राज्यमंत्री
▪ सुरेश अंगडी➖रेल्वे राज्यमंत्री
▪ रत्तनलाल कटारिया➖जलसंपदा राज्यमंत्री
▪ व्ही. मुरलीधरन➖परराष्ट्र राज्यमंत्री
▪ रेणुका सिंग सरुता➖आदिवासी राज्यमंत्री
▪ सोम प्रकाश➖वाणिज्य आणि व्यापार राज्यमंत्री
▪ रामेश्वर तेली➖अन्नप्रक्रिया राज्यमंत्री
▪ कैलाश चौधरी➖कृषी राज्यमंत्री
▪ देबोश्री चौधरी➖महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री
▪ नित्यानंद राय➖गृह राज्यमंत्री
▪ रामदास आठवले➖सामाजिक न्याय राज्यमंत्री
▪ साध्वी निरंजन ज्योती➖ग्रामविकास राज्यमंत्री
▪ प्रल्हाद जोशी➖संसदीय कामकाज राज्यमंत्री
▪ प्रताप सारंगी➖सुक्ष आणि लघु उद्योग राज्यमंत्री
▪ अश्वनी चौबे➖आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री

Tuesday, 4 June 2019

आमच्या शाळेतील उपक्रम

आमच्या शाळेत नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यातील काही छायाचित्रे आपण खाली बघू शकता.
व हे उपक्रम तुम्हीही तुमच्या शाळेत राबू शकता. धन्यवाद
 गॅदरिंग चा सराव करताना 
 आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात दिंडी 
 २६ जानेवारी निमित्त ध्वज सजवताना 
 इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देऊन त्यांना वाचण्यासाठी पुस्तके वाटप केली.
 इयत्ता ७ वीचा निरोप समारंभाचा क्षण 
 शैक्षणिक सहल २०१९
शैक्षणिक सहल २०१९

How to perfect remove background image